दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२३ | फलटण |
दि. ५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्व पल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी भारतामध्ये ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो. या शिक्षक दिनाचे औचित्य साधून कृषि महाविद्यालय, फलटण येथील कृषि कन्यांद्वारे सिद्धेश्वर हायस्कूल पिंपरद येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरूवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. त्यानंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. कृषीकन्यांनी यावेळी कृषी क्षेत्रासंबंधी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच सिद्धेश्वर हायस्कूलच्या विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. रावसाहेब कोरडे, शिक्षक सौ. पोळ, सौ. पिसाळ व श्री. ढोक हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून दिले.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नितिशा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या प्रतीक्षा जगताप, अक्षदा जाधव, समृद्धी जगताप, निशीगंधा खुडे, प्रणिता गोडसे, आरती जाधव, आर्या जाधव यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे साजरा केला.