स्थैर्य, फलटण : सासवड ता. फलटण येथे असणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या वतीने महात्मा फुले हायकूल व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशानुसार सोशल डिस्टंसिंगचा वापर करून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सासवड शाखाप्रमुख गणेश पाटणे यांनी बॅकेच्या विविध कर्ज योजना व बँकेने नुकतेच चालू केलेल्या UPI ग्राहक सेवेची माहिती दिली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँके तर्फे घोषित केलेल्या सॅलरी पॅकेज योजनेचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाटणे यांनी केले.
या कार्यक्रमाचे नियोजन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरकाळे यांच्या सूचनेनुसार व फलटण विभागीय कार्यालयाचे विभागीय विकास अधिकारी अविनाश खलाटे व बी एस बरकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या वेळी महात्मा फुले हायस्कूलच्या प्राचार्या सौ. काकडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सासवड शाखेतील सोनाली पाटणे, विकास अभंग, निलेश साळुंखे व विशाल धुमाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. प्राचार्या सौ. काकडे यांनी आभार मानले.