दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । मुंबई । ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (“टीसीआय”) या भारतातील आघाडीच्या एकात्मिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स सोल्युशन्स प्रोवायडर कंपनीने आज ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीचे वित्तीय निकाल जाहीर केले.
टीसीआयने आर्थिक वर्षाच्या तिस-या तिमाहीत संचालनातून ७५९ कोटी रु उत्पन्न मिळवले आहे ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत ६.२% वाढ झाली आहे. कंपनीचा कर पश्चात नफा ७८ कोटी रुपये झाला असून आर्थिक वर्ष २०२१मधील तिसऱ्या तिमाहीतील ४० कोटी रुपयांची तुलना करता यात ९४% वाढ झाली आहे.
कंपनीचे ईबीटीडीए आर्थिक वर्ष २०२१च्या तिसऱ्या तिमाहीतील ८४ कोटी रुपयांच्या तुलनेत या तिमाहीत ११४ कोटी रुपये झाले आहे. कंपनीचे ईबीआयटीडीए मार्जिन १४.९ टक्के झाले आहे जे आर्थिक वर्ष २०२१च्या तिसऱ्या तिमाहीत ११.६ टक्के होते.
टीसीआयने या आर्थिक वर्षात संचालनातून २३५९ कोटी रु उत्पन्न मिळवले आहे ज्यात मागील वर्षाच्या तुलनेत २३.५% वाढ झाली आहे. कंपनीचा कर पश्चात नफा आर्थिक वर्ष २०२१च्या पहिल्या ९ महिन्यांत ८५ कोटी रुपये होता ज्यात १४३ टक्क्यांनी वाढ होऊन या आर्थिक वर्षात २०६ कोटी रुपये झाला आहे.
कंपनीचे ईबीटीडीए ३२० कोटी रुपये झाले असून आर्थिक वर्ष २०२०च्या ९ महिन्यांत ते १९७ कोटी रुपये होते. कंपनीचे ईबीआयटीडीए मार्जिन १३.५ टक्क्यांवर आले आहे जे आर्थिक वर्ष २०२१च्या ९ महिन्यांत १०.२ टक्के होते.
टीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विनीत अगरवाल, म्हणाले, “चालू आर्थिक वर्षातील तिसरी तिमाही आणि ९ महिने प्रोत्साहक आहेत आणि देशातील सकारात्मक आर्थिक हालचालींशी सुसंगत आहेत. सर्व सेवा उत्पादनांनी टॉप-लाइन व बॉटम-लाइन अशा दोन्ही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली आहे. सध्या चाललेल्या सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहन उद्योगाला मर्यादा आलेल्या असूनही सणासुदीच्या काळात व्यवसायात चांगली वाढ झाली. बहुमार्गीय लॉजिस्टिक्सने नफ्याची घोडदौड सुरू ठेवली, विशेषत: आमच्या कोस्टल शीपिंग व्यवसायाने अपवादात्मकरित्या उत्तम कामगिरी केली. टीसीआयने बहुमार्गीय व्यवसायातील गुंतवणूक कायम ठेवली आहे आणि जीएचजी उत्सर्जनाच्या कपातीकडे कल राखल्याने आमच्या क्लाएंट्सचे सकारात्मक ईएसजी पालन वाढले आहे. ३पीएल आणि कोल्ड चेन सप्लाय सोल्युशन्सची मागणी, पूर्तता व ग्राहकसेवेसाठी, तंत्रज्ञान सक्षम प्लॅटफॉर्म्सद्वारे सातत्याने वाढताना आम्हाला दिसत आहे. कॉर्पोरेट बोर्ड रूम्समधील लॉजिस्टिक्सचे महत्त्व, सरकारच्या संरचनेतील गुंतवणुका आणि आत्मनिर्भर भारत या सर्व बाबी टीसीआयसारख्या बहुमार्गीय लॉजिस्टिक्स कंपनीसाठी उत्तम ठरत आहेत.”