
थेट WhatsApp वर मिळवा
तावरेनगरमधील एकनिष्ठ गणेश उत्सव मंडळाच्या ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग. सुहानी भोसले आणि पूजा अहिवळे ठरल्या पैठणीच्या मानकरी.
स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : तावरेनगर येथील एकनिष्ठ गणेश उत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित ‘खेळ पैठणीचा, उत्साह आनंदाचा’ या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी मोठा सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सुहानी भोसले आणि पूजा अहिवळे या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
विविध स्पर्धा आणि उत्स्फूर्त सहभाग
कार्यक्रमाची सुरुवात शिवराय, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावरील प्रश्नमंजुषेने झाली. त्यानंतर ‘तळ्यात-मळ्यात’, हात न वापरता मिरची बाटलीत टाकणे, बिस्किटाचा खेळ आणि संगीत खुर्ची अशा स्पर्धा घेण्यात आल्या. प्रबोधनकार महावीर भालेराव आणि बाबासाहेब जगताप यांनी खेळांचे नियोजन केले. सोमीनाथ घोरपडे आणि रामचंद्र मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विजेत्यांचा सन्मान आणि उद्देश
अंतिम फेरीत सुहानी भोसले व पूजा अहिवळे यांनी पैठणी मिळवली. सुवर्णा भोसले आणि निकिता सरतापे यांनी विजेतेपदे पटकावली. या कार्यक्रमातून पैठणी जिंकण्यासोबतच महिलांच्या आत्मविश्वासाला आणि आनंदाला मोठे व्यासपीठ मिळाले. आयोजनासाठी संदीप निकाळजे, नितीन रजपूत आणि सचिन खुडे यांनी परिश्रम घेतले.