स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी
मंगळवारी ब्रिक्स देशांच्या संमेलनात सामील झाले होते. यावेळी मोदींनी
पाकिस्तानवर निशाना साधला. मोदी म्हणाले की, ‘दहशतवाद ही सध्या सर्वात मोठी
समस्या आहे. याचा सामना जगातील अनेक देशांना करावा लागत आहे. जे देश सध्या
दहशतवादाचे समर्थन करत आहेत, त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल.’
ब्रिक्सच्या
व्हर्च्युअल समिटमध्ये बोलताना मोदी म्हणाले की, “भारत आणि दक्षिण
आफ्रीकेने कोविड-19 व्हॅक्सीन उपचार आणि संशोधनासंबंधी अॅग्रीमेंट केले
आहेत. यात सवलत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. आम्हाला आशा आहे की,
ब्रिक्समधील इतर देशही याचे समर्थन करतील. यापुढे डिजिटल हेल्थमध्ये मदत
करण्यावर भारत काम करेल.’
ब्रिक्स
संमेलनात परस्पर सहकार्य आणि दहशतवाद, व्यापार, आरोग्य, ऊर्जा तसेच कोरोना
साथीच्या आजारामुळे होणारे नुकसान यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग,
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनारो आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर
पुतिन उपस्थित होते.
भारत आणि चीनमधील तणावादरम्यान ब्रिक्स परिषद आयोजित
ब्रिक्स
देशांचे हे संमेलन अशावेळी आयोजित झाले, जेव्हा यातील दोन प्रमुख देश,
भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखवरुन तणाव सुरू आहे. परंतू, आता दोन्ही
देशांनी आपले सैनिक परत घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मागच्या एका
महिन्यात दुसऱ्यांना मोदी आणि जिनपिंक व्हिडिओ कॉलवर आमने-सामने आले.
कोरोनामुले यंदा हा कार्यक्रम व्हर्च्युअली आयोजित केला होता.
पुढील ब्रिक्स संमेलनाचे अध्यक्षपद भारताकडे
ब्रिक्समध्ये
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रीका सामील आहे. यावेळेस
संमेलनाची थीम ‘जागतिक स्थिरता, सामुहिक सुरक्षा आणि अभिनव विकास’ आहे.
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पुढील ब्रिक्स शिखर संमेलनाचे
अध्यक्षपद भारताकडे असेल. भारत 2021 मध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या 13
व्या शिखर संमेलनाचे आयोजन करेल. यापूर्वी भारताने 2012 आणि 2016 मध्ये
ब्रिक्स देशांच्या शिखर संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते.