तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण; वेबसीरीजच्या शूटिंग दरम्यान झाला संसर्ग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.५: ‘बाहुबली’ फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला कोरोनाची लागण झाली आहे. ती हैदराबादमध्ये एका वेब सीरिजचे शुटिंग करत होती. चित्रीकरणादरम्यान तिच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यापूर्वी तिच्या आईवडिलांना कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा देखील ती आयसोलेशनमध्ये होती. 

ऑगस्टमध्ये आईवडिलांना झाला होता कोरोना संसर्ग 


वृत्तानुसार, तमन्नाला हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल आहे. तज्ञांच्या पथकाद्वारे तिच्यावर उपचार सुरू आहेत. ऑगस्टमध्ये, तमन्नाने तिचे वडील संतोष भाटिया आणि आई रजनी भाटिया यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. तमन्नाने सांगितले होते की, माझ्या कुटुंबियांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसू लागल्याने, खबरदारी म्हणून आम्ही सर्वांनी कोरोना चाचणी केली. आणि या चाचणी दरम्यान माझ्या आई-वडिलांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यावेळी तमन्नासह तिच्या स्टाफ मेंबर्सची चाचणी निगेटिव्ह आली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!