JEE अॅडव्हान्सचा निकाल जाहीर : पुण्याचा चिराग 396 पैकी 352 गुण मिळवत देशात पहिला, 23 IITsमध्ये प्रवेश प्रक्रिया 6 ऑक्टोबरपासून होणार सुरू


 

स्थैर्य, दि.५: भारतीय प्रौद्योगिक संस्थान (IIT)दिल्लीने JEE अॅडव्हान्स 2020 परिक्षेच्या 7 दिवसांनंतर निकाल जाहीर केला. यामध्ये चिराग फलोर या आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याने 396 पैकी 352 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर आयआयटी रुडकी झोनची कनिष्का 315 गुणांसह विद्यार्थिनींमध्ये पहिली आली आहे.

या परीक्षेत एकूण 43 हजार 204 विद्यार्थी पास झाले. यामध्ये 6 हजार 707 मुली आहेत. यावर्षी 1.6 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स परिक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 96% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

या 5 टप्प्यात पाहा निकाल 

सर्वात पहिले jeeadv.ac.in वेबसाइटवर लॉग इन करा.

होमपेजवर “JEE अॅडव्हान्स रिझल्ट” वर क्किल करा.

मागितलेली माहिती प्रविष्ट करा.

तुमचा निकाल समोर उपलब्ध होईल.

निकाल डाउनलोड करा आणि भविष्यासाठी प्रिंट घ्यायला विसरू नका.

सर्व्हर डाउन झाल्यामुळे झाला उशीर 

IIT दिल्लीने JEE अॅडव्हान्सचा निकाल सकाळी 10 वाजता जारी करण्याची घोषणा केली होती. मात्र सर्व्हर डाउन झाल्यामुळे निकाल 50 मिनिटे उशिरा जाहीर झाला .


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!