• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
No Result
View All Result
शनिवार, फेब्रुवारी 4, 2023
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मालमत्तेच्या मोहजालातून तलाठ्याने केला झोल?; कोळकित एकाच जमिनीचे दोन सात-बारे

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
जानेवारी 13, 2023
in फलटण

दैनिक स्थैर्य । दि. १३ जानेवारी २०२३ । कोळकी । कोळकी येथे मालमत्तेच्या मोहजालातून अनेक झोल झाले असल्याचे समोर येत आहेत. सुमारे सत्तर ते ऐंशीच्या दशकातील तलाठी अरुण देशपांडे यांच्या कार्यकालात हे झोल झाले असल्याचे सांगतात. विशेष म्हणजे ज्या मालमत्तेच्या कागदपत्रात त्रूटी आढळतात, तेथे देशपांडे यांच्या नातेवाईकांची व निकटवर्तीयांची नावे असल्याचे दिसत आहे. दरम्यान, देशपांडे यांच्या कार्यकालात झालेल्या या झोलमुळे सध्या तालुक्यातील महसूल वर्तुळ खडबडून जागे झाले असून देशपांडे यांच्याकडून मालमत्ता विकत घेणारे खातेदार देखील आता डोक्याला हात लावून बसले आहेत.

विक्रमसिंहराजेंनी अवघ्या दोन हजारात दिली जागा

कोळकीतील सर्व्हे नं. 121/1ब/1ब/1अ या जागेवरुन सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते. मात्र, या जागेच्या खोलात गेल्यास सर्व्हे नं. 121/1ब/1ब/1अ याठिकाणी 81 गुंठे जागा आहे.वास्तविक ही जागा कै. श्रीमंत विक्रमसिंहराजे मालोजीराजे नाईक निंबाळकर यांची होती. श्रीमंत विक्रमसिंहराजे यांनी ही जागा दि. 10 ऑगस्ट 1978 साली गजानन पांडुरंग भोकरे यांना खरेदी दस्त करुन दिली. अवघ्या दोन हजार रुपयांना कै. श्रीमंत विक्रमसिंहराजे यांनी ही जमिन दिली. त्यानूसार दि. 22 सप्टेंबर 1978 रोजी तत्कालीन मंडलाधिकार्‍यांनी हा दस्त नोंदवला. त्यानूसार 16241 फेरफार क्रमांकाने गजानन पांडुरंग भोकरे यांचा सातबारा देखील तयार झाला.

तलाठ्यांनी केली स्वत:च्या वडिलांच्या नावाची नोंद

त्यानंतर दि. 7 सप्टेंबर 1979 रोजी फक्त एका अर्जाद्वारे पुन्हा फेरफार तयार करण्यात आला. व फेरफार क्रमांक 16752 प्रमाणे तलाठी अरुण देशपांडे यांचे वडील गोपाळ हणुमंत देशपांडे यांच्या नावे सात बारा तयार झाला. नोंदणी कायद्याप्रमाणे रक्ताचे नाते नसताना मालमत्ता हस्तांतरीत झाली असल्याचे इथे दिसत आहे. तलाठी अरुण देशपांडे यांनी स्वत:च्या फायद्यासाठी ही नोंद धरली का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

तहसिलदारांनी काढला बिनशेती आदेश

त्यानंतर दि. 10 सप्टेंबर 1981 रोजी तहसिलदारांनी ही व आजूबाजूची काही मालमत्ता बिनशेती करण्याचा आदेश काढला. आय. एन. डी./आय. आय./ एन. ए./ एस. आर.-21 याप्रमाणे सदरची मालमत्ता बिनशेती झाली. दि. 3 ऑगस्ट 1982 रोजी फेरफार क्र. 34 ने ही मालमत्ता बिनशेती म्हणून नोंद करण्यात आली आहे.

थेट खरेदीदारांच्या नावे सात-बारा झालाच कसा?
मालमत्ता बिनशेती झाल्यानंतर ज्यांची मालमत्ता आहे, त्यांच्या मालमत्तेचे स्वतंत्र सातबारे त्यांच्याच नावे तयार होतात. व मूळचा जो एक सातबारा असतो, तो रद्द करण्यात येतो. पण, या प्रकरणात तसे झालेले दिसत नाही. तत्कालीन तलाठ्यांनी हे सात बारे थेट खरेदीदारांच्या नावे केल्याचे समोर येत आहे. सोबतच मूळचा जो एकच सातबारा आहे, तो रद्द करण्यात आला नाही. सध्या या जागेचे दोन सातबारे ऑनलाईन दिसत असून मुळचा सातबारा व खरेदीदारांचे वेगवेगळे सात-बारे येथे दिसत आहेत.

देशपांडे यांना स्वत:ची मालकी सिद्ध करणे कठीण

दरम्यानच्या काळात या जागेलगत असणारे मुगुटराव शिंदे व देशपांडे यांचे चतु:सिमेवरुन वादंग झाले. हा वाद फलटण, सातारा आणि मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेला. या न्यायालयीन प्रकरणात देशपांडे यांना ही जागा स्वत:च्या नावावर झालीच कशी? याबाबत सिद्ध करण्यात आले नाही. म्हणून तीन्हीही न्यायालयाने त्यांचे अपिल फेटाळून लावले होते.

भोकरे यांची जागा त्यांच्याच नावे हवी

मुंबई उच्च न्यायालयाने 1997 साली दिलेल्या निर्णयानंतर देशपांडे यांनी इतरत्र कोठेही धाव घेतलेली नाही. याउलट देशपांडे यांच्या काही कागदपत्रांनूसार ही जागा भोकरे यांच्याच मालकीची असायला हवी, असे सांगितले आहे. दि. 1 जून 2019 रोजी देशपांडे यांच्या वारसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेल्या तक्रार अर्जानूसार ही जमिन भोकरे यांचीच आहे, हे स्पष्टपणे कबूल केलेले आहे. दि. 15 मार्च 2022 रोजी देशपांडे यांच्या वारसाने फलटणच्या उपविभागीय अधिकार्‍यांकडे केलेल्या एका अपिलात देखील हे मान्य केलेले आहे.

दोन हजाराची जागा ४० लाख रुपयांना परत घेतली

हे प्रकरण अद्याप येथे संपलेले नाही. दरम्यान, 1995 साली कै. श्रीमंत विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांनी ज्यांना जमिन विकली होती ते गजानन पांडुरंग भोकरे हे गृहस्थ माघारी आले. आणि जमिनीचा ताबा आपल्याला अद्यापही मिळालेला नाही, म्हणून माझे पैसे मला माघारी द्या, असे म्हणू लागले. म्हणून दि. 15 मार्च 1995 साली कै. विक्रमसिंहराजे यांनी गजानन भोकरे यांना त्यांचे चिरंजीव प्रमोद व त्यांचे बंधू सुर्यकांत भोकरे यांच्या साक्षीने 25 हजार रुपये माघारी दिले. तशी पावती देखील आढळते आहे. त्यानूसार भोकरे हे जमिन देण्यास तयार आहेत. तसे प्रतिज्ञापत्र दि. 23 मार्च 2022 रोजी भोकरे यांनी तहसिलदारांना दिले आहे. याखेरीज कै. विक्रमसिंह राजे नाईक निंबाळकर यांचे वारस श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी माणुसकीच्या नात्याने भोकरे यांच्या वारसांना ४० लाख रुपये देखील चेकने दिले आहेत. त्यानूसार कै. विक्रमसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या वारसांना भोकरे यांनी जमिन देणे क्रमप्राप्त ठरते आहे.


Previous Post

शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे सासवडमधील डिपी कार्यान्वित

Next Post

बऱ्हाणपूर मध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

Next Post
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करताना मान्यवर व पदाधिकारी

बऱ्हाणपूर मध्ये जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

ताज्या बातम्या

‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार

फेब्रुवारी 4, 2023

जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी

फेब्रुवारी 4, 2023

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

फेब्रुवारी 4, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

फेब्रुवारी 4, 2023

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

फेब्रुवारी 4, 2023

प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

फेब्रुवारी 4, 2023

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

फेब्रुवारी 4, 2023

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

फेब्रुवारी 4, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!