ज्येष्ठांची देखभाल, संततीवर संस्कार हीच खरी पंढरीची वारी – प्रा. रवींद्र कोकरे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ जुलै २०२४ | फलटण |
ज्येष्ठांची देखभाल, संततीवर संस्कार, सन्मानमार्गाने धनसंपदा, सामाजिक जाणीव, सेवेची तत्परता, वाणीची विनम्रता हीच खरी पंढरीची वारी संत सद्गुरू बाळुमामा यांना अभिप्रेत होती. चांगले कर्म केल्यास वारीची पुण्याई भेटते, असे प्रतिपादन कथाकार व प्रबोधनकर प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.

खटकेवस्ती (गोखळी) येथे संत बाळुमामा मेंढी माऊली आगमन वर्षपूर्ती व देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त ‘सावळे परब्रह्म’ या विषयावर आयोजित व्याख्यानातून प्रा. कोकरे विचार मांडत होते.

घरातल्या कोणालाच उपाशी व त्रास न देता केला जातो तो उपवास. चांगले कर्म, शुद्ध वागणूक, नैतिक आचरण पांडुरंगाला आवडते. साधी सरळ भक्तिभावाने सेवा करणं यातच संत बाळुमामा आपणास भेटतात, असे मंत्रमुग्ध करणारं वक्तव्य करून भाविक श्रोत्यांची प्रा. कोकरे यांनी मने जिंकली.

संत बाळुमामा प्रतिमा पूजन, महाआरती, खिचडी, वृक्षभेट, व्याख्यान, कीर्तन, महाप्रसाद यांचे बाळुमामांच्या तळावर ग्रामस्थांनी चोख नियोजन केले होते.

या सोहळयास संतोष राऊत, सुखदेव खटके, सदा वळकुडे, मच्छिंद्र खटके, निखील खटके, सतिश खटके, सचिन खटके, महेश खटके, स्वप्नील खटके, राहुल धुमाळ, अजय चव्हाण, अमोल बागाव, गणेश सोनवणे, अमोल वळकुडे, अभिजीत वळकुडे, दगडू पाटील, सुनिल गायकवाड, महादेव वळकुडे, सुनिल गुजले, हरिभाऊ जाधव, वनराज जाधव, नंदकुमार खटके यांनी विशेष परिश्रम घेऊन उत्सव साजरा केला. पंचक्रोशीतील महिला भाविक यांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती.


Back to top button
Don`t copy text!