उत्तमराव जानकरांना विधानपरिषेदेवर घ्या : विकास सोनवलकर


स्थैर्य, दुधेबावी : नुकत्याच झालेल्या माळशिरस विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तमराव जानकर यांना विधानपरिषदेत संधी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विकास सोनवलकर यांनी केली आहे. उत्तमराव जानकर यांनी गेली अनेक वर्षे माळशिरस तालुक्यातील जनतेची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सेवा केली आहे. त्यांनी यापूर्वी चंदापुरी साखर कारखाना चेअरमन, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती, धनगर समाज आरक्षण क्रुती समिती सदस्य या पदावर काम केले आहे. या पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करून विविध प्रकारचे प्रश्न सोडवले आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाज आरक्षणाच्या प्रश्नावर काम केले आहे. त्यांच्या या कार्याचा विचार करून त्यांना विधान परिषदेत काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विकास सोनवलकर यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!