सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या; मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने फलटणमध्ये प्रांतांना निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण : सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षण टिकण्यासाठी योग्य ती खबरदारी सरकारने घ्यावी. कोपर्डीच्या नराधमांना ताबडतोब फाशी देण्यात यावी. सारथी संस्थेच्या माध्यमातून मदत करावी. शिवस्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तरुण तरुणींना आर्थिक सहकार्य मिळावे, अशा अनेक मागण्यांसाठी आज मराठा क्रांती मोर्चा फलटण यांचे वतीने मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांचे निवेदन फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्या मार्फत पाठवण्यात आलेले आहे. 

मराठा आरक्षणाचा प्रश्नात राज्य सरकारने योग्य त्या पद्धतीने वेळोवेळी बैठका घेऊन आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच दिग्गज वकिलांची फौज तयार करून अडथळे येतील ते दूर करावेत, अशी मागणी सदरील निवेदनात करण्यात आलेली आहे. 

कोपर्डी सारखी घटना पुन्हा तांबडी येथे घडली असून त्या नराधमांना कडक शासन करावे व या पुढे अशा घटना घडू नयेत यासाठी कठोर शिक्षा या नराधमांना देण्यात यावी, म्हणजे असे कृत्य करण्याचे धाडस पुन्हा कोणाचेही झाले नाही पाहिजे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले आहे. 

जगाला आदर्श ठरलेले 58 मोर्चे महाराष्ट्रात विविध ठिकाणी निघाले होते. त्या वेळी कुठेही कायदा व सुव्यवस्था मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने भिघडु दिली नव्हती. याचा एक मोठा आदर्श निर्माण करणाऱ्या मराठा समाजाला कोणी डीवचू नये. आमच्या माता भगिनींना त्रास देऊ नये. जर अश्या घटना समोर आल्या तर कायदा हातात घ्यावा लागला तरीही मागे पुढे कोणीही बघणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीने सरकारला देण्यात आलेला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!