कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी : सत्यजितसिंह पाटणकर


स्थैर्य, पाटण, दि. 6 : कोयनानगर, ता. पाटण येथे एका दिवसात कोरोना बाधित सहा रुग्ण आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी कोयनानगर येथे जाऊन ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांनी घाबरून न जाता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. पाटणकर म्हणाले, वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गरज असेल तरच कोयना विभागातील नागरिकांनी बाहेर पडावे. तोंडाला मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग पाळूनच खबरदारी घ्यावी. कोयना विभागातील जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे. कोरोनाबाबत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!