दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने यांनी फलटण शहराच्या शेजारील सातारा रस्त्यावर बाणगंगा नदीवरील पुलाचे काम करण्यासाठी दि. 10 फेब्रुवारी पासून वाहतूक बंद करण्यात येणार आहे. नदीवरील पूल बंद केल्यानंतर पर्यायी व्यवस्था तातडीने करण्यात यावी व त्यानंतरच फोन बंद करण्यात यावा, ती मागणी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेली आहे.
शहरांमधील नागरिकांची, विद्यार्थ्यांची व रुग्णांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके, शहराध्यक्ष पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग फलटण यांना निवेदन दिले. जो पर्यंत, संत बापूदास नगर हनुमाननगर, वाठार मळा व चिंगीचा मळा, फरांदवाडी व परिसरातील रहिवासी यांना फलटण कडे जाणेयेण्यासाठी साठी हनुमान नगर कमानी मधुन मलठण येथील विटभट्टी मार्गाने जवळचा रस्ता चालू करुन देत नाही तो पर्यंत, बाणगंगा नदीच्या पुलावरील वाहतूक बंद करु देणार नाही, असा इशारा फलटण तालुका काँग्रेस ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दिपक दशरथ शिंदे यांनी दिला. या वेळी अमीर शेख उपस्थित होते.