स्थैर्य, फलटण दि.२७: फलटण नगर परिषदेच्या मालकीच्या राजधानी टॉवर्स या इमारतीत गाळा क्र.1 व गाळा क्र.2 मध्ये झालेले बेकायदेशीर बांधकाम आणि रस्त्यावरील पायर्या याबाबत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधूनही आजपर्यंत राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई झालेली नाही. तरी या बेकायदेशीर बांधकामाविरोधात दि.31 मे पर्यंत पालिकेने कारवाई न केल्यास दि.1 जून पासून नगर परिषदेसमोर सर्व विरोधक्ष नगरसेवक बेमुदत धरणे आंदोलन करतील, असा इशारा फलटण नगरपरिषदेचे गटनेते, नगरसेवक अशोक जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेदन देतेवेळी नगरसेवक सचिन अहिवळे उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना, फलटण नगर परिषदेच्या महावीर स्तंभ येथे होत असलेल्या राजधानी टॉवर्स या इमारतीमध्ये संबंधित गाळाधारकाच्या फायद्यासाठी बेकायदेशीरपणे बदल केलेले आहेत. या विरोधात आपण यापूर्वी तक्रार देऊनही अद्याप पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. केवळ राजकीय दबावापोटी ही कारवाई टाळली जात असून मुख्याधिकार्यांनी दि.31 मे पर्यंत या विरोधात कारवाई न केल्यास 1 जून पासून आम्ही सर्व विरोधी नगरसेवक कोरोना संबंधींचे नियम पाळून पालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु करणार असल्याचे अशोक जाधव यांनी सांगीतले.