तडीपाराच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, नागठाणे, दि. 12 : सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या गुंडास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नांदगाव( ता.सातारा) येथून ताब्यात घेतले.शुभम उर्फ खंड्या दत्तात्रेय गायकवाड (वय.21, रा. नांदगाव, ता सातारा) असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे.

गुरुवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि आनंदसिंह साबळे,हवालदार कापरे व कचरे हे बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगाव, खोजेवाडी, नांदगाव येथे पेट्रोलिंग करत असताना सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेला शुभम उर्फ खंड्या गायकवाड हा नांदगाव येथील स्मशानभूमीजवळ आढळून आला. त्याला परवानगीबाबत विचारणा केली असता कोणतीही परवानगी नसल्याचे आढळले. स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार धीरज महाडिक यांनी याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली असून शुभम उर्फ खंड्या गायकवाड याला तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी  अटक केली आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!