जमिनीच्या वादातून शिरढोण येथे एकावर तलवारीने वार


 

स्थैर्य, कोरेगाव, दि.२२: जमिनीच्या वादातून शिरढोण, ता. कोरेगाव येथे आठ जणांनी एकावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले. हा हल्ला युवकाच्या सख्या भावासमोरच करण्यात आला. यातील एकाने भावास रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पुन्हा जमिनीत आला तर दोघा भावांच्या डोक्यात गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

याबाबत माहिती जखमी युवकाचा भाऊ बाळु अशोक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा व अनिल जयसिंग कदम यांचा जमिनीच्या वहिवाटीवरून वाद आहे. दि. 21 रोजी ते सायंकाळी पाचच्या सुमारास ते घरी जात असताना त्यांचे बंधू शंकर अशोक जाधव यांच्यावर काहीजणांनी हल्ला केल्याचे त्यांना मित्राने फोनवरून सांगितले. त्यामुळे ते त्याठिकाणी गेले असता तेथे अनिल कदम, सुनील कदम, निलेश कदम, विशाल कदम, बजरंग शिखरे, रा. शिरढोण, ता. कोरेगाव व रविंद्र बर्गे, गणेश धनावडे, संदीप सुधीर खिरे रा. कोरेगाव हे भावास मारहाण करत असलयाचे दिसून आले. संशयितांपैकी अनिल कदम, सुनील कदम, निलेश कदम, विशाल कदम, बजरंग शिखरे यांच्याकडे तलवारी होत्या तर गणेश धनावडे याच्याकडेे रिव्हॉलर होते. तलवारी बाळणार्‍या संशयीतांनी शंकर यास तलवारीने डोक्यात मारहाण करुन गंभीर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुनील संतोष बोडरे, विजय यशवंत जाधव यानी भांडणे सोडवण्यास आले असता त्यांनाही तलवार दाखवुन दमदाटी केली. 

गणेश धनावडे याने फिर्यादी बाळू जाधव यांनाही जमीनीमध्ये यायचे नाही. आला तर दोघां भावांच्या डोक्यात गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. यानंतर फिर्यादी बाळू जाधव यांनी जखमी भावाला घेवून खाजगी वाहनाने कोरेगाव पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्याचे व्यवस्था केली. तेथे प्राथमिक उपचार करून शंकर जाधव यांना जिल्हा रुग्णालयात हलवले आहे. याप्रकरणी सर्व संशयीतांवर कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!