यंदाच्या गळीत हंगामासाठी ‘स्वराज’ कारखाना सज्ज; 12 ऑक्टोबर रोजी कारखान्याचा बॉयलर पेटणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. 05 ऑक्टोबर 2021 । फलटण । येथील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअल लि; संचलित लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर कारखाना यंदाच्या ऊस गळीत हंगामाासठी सज्ज झाला असून मंगळवार, दि.12 ऑक्टोबर रोजी कारखान्याचा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ पार पडणार आहे.

सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांची गरज लक्षात घेवून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सात वर्षांपूर्वी या कारखान्याची उभारणी फलटण तालुक्यातील उपळवेच्या माळरानावर व सितामाईच्या डोंगरकुशीत केली. गतवर्षी सन 2020 – 2021 च्या हंगामात 6 लाख 52 हजार 480 मेट्रीक टन इतके उच्चांकी गाळप करुन ऊस उत्पादकांना कारखान्याने एफ.आर.पी. पेक्षा 25% जास्त रक्कम म्हणजे प्रतिटन रुपये 2,600 एवढा दर दिला आहे.

गतवर्षीच्या हंगामामध्ये कारखान्याने केमिकल विरहीत साखर उत्पादीत करुन निर्यात केली. चांगल्या प्रतीची साखर देशातील नामांकित कंपन्यांना पुरवठा केली. त्याचबरोबर उच्चांकी वीजनिर्मिती करुन महाराष्ट्र शासनाच्या वीज कंपनीस वितरीत केली. केंद्र शासनाच्या धोरणानुसार कारखान्यांच्या डिस्टीलरी प्रकल्पामधून थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करुन सर्वात जास्त पुरवठा करणारा महाराष्ट्रातील हा एकमेव कारखाना ठरला आहे.

कारखान्याचे मार्गदर्शक खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून डिस्टलरीमध्ये एमव्हीआर व एसीसी या तंत्रज्ञानाने उभारणी करणारा हा जगातील पहिला प्रकल्प ठरला आहे. तसेच 36 टन क्षमतेच्या इन्सीनरेशन प्रकल्पामध्ये सांड पाण्यावरती प्रक्रिया करुन ऊर्जा निर्मिती केली जात आहे. झिरो लिक्वीड डिसचार्ज या तंत्रज्ञानावर चालणारा हा आधउनिक प्रकल्प आहे. या कारखान्यामध्ये जर्मन तंत्रज्ञानाचा जीइए या कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा सीपीयु / एसीसी प्रकल्प आहे. ज्यामध्ये ऊसाच्या रसातील 25 लाख लिटर पाणी निर्मिती करणारा म्हणजेच पाणी न घेता पाणी निर्मिती करणारा व डीसीएस व एपीएस या तंत्रज्ञानाद्वारे उच्च प्रतीची सुरक्षितता व आधुनिकता असणारा भारतातील पहिला प्रकल्प आहे.

कारखाना व्यवस्थापनाने पुढील हंगामात गाळप क्षमता 5 हजार मेट्रीक टनावरुन 15 हजार मेट्रीक टना प्रतिदिन व वीज निर्मिती 22.5 मेगावॅट वरुन 100 मेगावॅट तसेच डिस्टीलरी क्षमता 60 हजार लिटर वरुन 5 लाख लिटर प्रतिदिन उभारणी करण्यात येत आहे. या विस्तारीत प्रकल्पामुळे तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून कारखाना परिसराचा विकास होण्यास मदत होणार आहे या प्रकल्पामुळे ऊस उत्पादकांचे ऊस गाळप लवकरात लवकर होण्यासही मदत होणार आहे. याशिवाय कारखाना व्यवस्थापनाने फक्त कर्मचार्‍यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटूंबियांचासुद्धा विचार करुन 2 लाखापर्यंत विमा कवच योजना सुरु केली आहे.

या सर्व बाबींचा विचार करता हा कारखाना अत्याधुनिक तंत्रज्ञानासह विस्तारीत होत असून गरुड भरारी घेत आहे. प्रत्यक्षात चालू वर्षी कारखान्याचे तीनही प्रकल्प दुपटीहून अधिक क्षमतेने व जोमाने सुरु होत आहेत. व्यवस्थापनाचा दूरदर्शीपणा व कामगारांचे योगदान यामुळेच कारखान्याची ही प्रगती पथावर घोडदौड सुरु आहे.


Back to top button
Don`t copy text!