ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१५ जानेवारी २०२२ । फलटण ।  राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिन म्हणून ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या विद्यालयात उत्साहात ऑनलाइन पद्धतीने साजरी करण्यात आली. या निमित्ताने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली.

नुकत्याच सुरू झालेल्या शाळा कोरोनामुळे पुन्हा बंद करण्यात आल्या. लॉकडाऊन असूनही शाळा सुरू असल्याचा अनुभव मुलांना येण्यासाठी शाळेने हा कार्यक्रम झूम ॲप द्वारे ऑनलाइन सादर केला. कार्यक्रमात प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, शाळेचे प्राचार्य गिरिधर गावडे, उपप्राचार्य रमेश सस्ते व सर्व शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले.

यानंतर इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्यावर आधारित मराठी व इंग्रजीतून भाषणे व कविता सादर केल्या. यामध्ये वेदिका निंबाळकर, अथर्व साळुंके, ईश्वरी बनकर, स्वरांजली गायकवाड, रिहा चंकेश्वरा, अंकिता सस्ते, तनिष्का शिंदे, मुस्कान डांगे, दिया मिंड, आदिती शेडगे, प्रणव माळशिकारे, ऋतुजा पवार, श्रेयश खरात, सिद्धी ठोंबरे या विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली. भाषण करणाऱ्या विद्यार्थिनींनी राजमाता जिजाऊ यांचा व विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचा पेहराव केल्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली.

यानंतर शाळेतील शिक्षिका सौ वर्षा दोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात महिला सक्षमीकरण बद्दल माहिती सांगितली तसेच प्राचार्य गिरिधर गावडे यांनी आपल्या मनोगतात स्वामी विवेकानंदांचा विचार, त्यांचा जीवन प्रवास यांचे वर्णन करून तरुण कसा असावा याचे विवेचन केले. तसेच राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांवर कशा प्रकारे संस्कार केले हे सांगितले. व ओमायक्रोनमुळे शाळा बंद असल्याने पालकांनी मुलांना मोबाईल देऊन व घरी शैक्षणिक वातावरण तयार करून शाळेला सहकार्य करावे अशी विनंती सर्व पालकांना केली.

कार्यक्रम झूम ॲप द्वारे ऑनलाइन असल्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांनीही या कार्यक्रमाचा आनंद घेतला. तसेच संस्थेच्या सचिव सौ साधनाताई गावडे यांनीही या कार्यक्रमास ऑनलाईन उपस्थिती दर्शवून मुलांनी केलेल्या भाषणाचे व परिधान केलेल्या पोशाखांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता पाचवीतील विद्यार्थी राजवीर खटके यांनी तर आभार शिवराज बनकर यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता इयत्ता पहिलीतील अथर्व साळुंखे यांने पसायदान म्हणून केली.


Back to top button
Don`t copy text!