दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२१ | फलटण | हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनानिमित्त दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी आसू ता. फलटण, जि. सातारा येथे ११ वे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये काव्य लेखन, निबंध लेखन व प्रकाशित पुस्तक स्पर्धा घेतली जाणार आहे.
१) काव्य लेखन : काव्य लेखन स्पर्धेसाठी आपण राष्ट्रभक्तीपर काव्य लेखन करायचे आहे. कवितेचा कुठलाही प्रकार चालेल. कविता ४ ते ५ चरणाची किंवा २० ओळींची असावी. दिर्घ कविता स्पर्धेसाठी घेतली जाणार नाही. कविता स्वलिखीत असावी. कविता पाठविताना सोबत कविता स्वलिखीत असल्याचे स्वसाक्षांकित पत्र जोडावे.
२) निबंध लेखन : ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयावर निबंध असावा. शब्द मर्यादा नाही. निबंध कागदाच्या एकाच बाजूला लिहावा. त्यात आपले आपल्या देशाबद्दलचे विचार, देश कसा असावा, त्यासाठी मी काय करेन यावर विचार मांडावेत.
३) प्रकाशित पुस्तक : आपले नुकतेच प्रकाशित पुस्तक स्पर्धेसाठी पाठवू शकता. त्यात सर्व प्रकारचे साहित्य चालेल. प्रकाशित पुस्तकाच्या दोन प्रती पाठवाव्यात.
साहित्य पाठविण्याचा पत्ता : प्रकाश दिनकर सकुंडे, सचिव, श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठाण, आसू, ता. फलटण, जि. सातारा. ४१५५२३. भ्रमणध्वनी ९८८१०३७४९१.
आपले साहित्य फक्त पोष्टाने पाठवावे. What’s App पाठविलेले साहित्य स्पर्धेसाठी विचारात घेतले जाणार नाही. साहित्या सोबत आपली दोन ओळखपत्र आकाराची छायाचित्रे पाठवावीत.
प्रत्येक विभागातील ३ स्पर्धकांना स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०२१ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल. पुरस्काराचे स्वरुप सन्मान पत्र, सन्मान चिन्ह आणि वृक्षाचे रोप असेल.
कार्यक्रम दि. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी आसू, ता. फलटण येथे दोन सत्रात होईल. प्रथम सत्रात राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांची जयंती व पुण्यतिथी साजरी होईल. नंतर पुरस्कार वितरण होईल. दुसर्या सत्रात सर्व कवींचे खुले काव्य संमेलन होईल. त्यासाठी आपणास आपल्या आवडीची एक रचना सादर करता येईल.
सदर स्पर्धेसाठी कुठल्याही प्रकारचे सहभाग शुल्क घेतले जाणार नाही. सर्वासाठी सदर स्पर्धा खुली असणार आहे. स्पर्धेचे हे ११ वर्ष आहे. सर्व सारस्वताना विनंती आपण सहभाग घ्यावा. आपल्या स्वागताची आम्हा आसूकरांना संधी द्यावी ही विनंती.