दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । फलटण । राष्ट्रबंधू राजीव दीक्षित यांची जयंती व पुण्यतिथी यांचे औचित्य साधून फलटण तालुक्यातील आसू येथील श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेल्या काव्य लेखन स्पर्धेत दत्तात्रय भापकर यांच्या “भारत गान” या काव्याला स्वदेश भारत सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या समारंभात प्रकाश सकुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वदेशी भारत साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रा. दत्तात्रय भापकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, युवा नेते धिरेंद्रराजे खर्डेकर, जेष्ठ कवी हनुमंत चांदगुडे, जीवन इंगळे, धैरशील देशमुख, प्रमोद झांबरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. दत्तात्रय भापकर साहित्याला या पूर्वी सुद्धा विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भापकर यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध ज्ञानवंतांकडून, सामाजिक संस्था, जेष्ठ पत्रकार यांच्याकडून अभिनंदन केले जात आहे.