करंजे नाक्यावर अज्ञाताचा संशयास्पद मृत्यू


स्थैर्य, सातारा : करंजे, सातारा येथील रघुनाथपुरा येथील अंदेकर चौकात एका फिरस्त्याचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. याची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले. प्रथम दर्शनी एका ट्रॅव्हल्सखाली चेपलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने त्याचा ट्रॅव्हलसच्या खाली दबून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी, करंजे येथील रघुनाथपुरा येथील अंदेकर चौक येथे आज एका अज्ञात फिरस्त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळल्याची वार्ता पसरताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमू लागली. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर, संदीप शितोळे व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विशेष उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र साळुंखे यांनीही घटनास्थळी जावून पाहणी केली. प्रथमदर्शनी ट्रॅव्हल्सच्या खाली चेपलेल्या अवस्थेत चेपलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. यामुळे ट्रॅव्हल्स खाली दबून त्याचा मृत्यू आढळल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृत्यू घातपाताने झाला की अन्य कारणाने याचा पोलिस शोध घेत आहेत. याबाबत शाहूपुरी पोलिस ठाण्याचे सपोनि वायकर तपास करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!