त्याच दरीत चौथा मृतदेह आढळला
स्थैर्य, पांचगणी, दि. 2 (प्रतिनिधी) : संपूर्ण जिल्हा हादरवून सोडणार्या मार्ली घाटातील निष्पाप कुटुंबाच्या हत्याकांडातील चौथा मृतदेह खोल दरीत सापडला आहे. यामुळे दाम्पत्याच्या दोन मुलांचाही खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी योगेश निकम याच्यावर मेढा पोलिस स्थानकामध्ये चार जणांच्या खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्याला मेढा न्यायालयात दाखल केले असता 7 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
मार्ली घाटात 11 ऑगस्ट आणि 29 ऑगस्टला दोन मृतदेह आढळून आले होते. ते दाम्पत्याचे असल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करत संशयिताला जेरबंद केले होते. या संशयिताकडून सैतानालाही लावजेल, असे भयानक कृत्याचा उलगडा झाला. दाम्पत्याचसह दोन्ही मुलांना मारल्याचे कबुली त्याने दिल्यानंतर त्या दोन्ही तरुण मुलांचा शोध सुरू झाला. यानंतर 31 ऑगस्ट रोजी एका मुलाचा मृतदेह मार्ली घाटात सापडला. दुसर्या मुलाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मंगळवारी सकाळी पुन्हा तपास सुरू झाला. महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्रराजे ट्रेकर्सनी अविरत प्रयत्न करून दुसर्या मुलाचा खोल दरीतून मृतदेह शोधला.
दरम्यान, बुधवारी सकाळी 11 वाजता मेढा न्यायालयामध्ये संशयित आरोपी योगेश निकम हजर करण्यात आले. मेढा न्यायाधीश यांनी योगेश निकम याला सात दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली आहे. या सात दिवसात पोलीस तपासात अन्य काही गुन्ह्यांची उकल होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आज सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मेढा मारली घाटामध्ये घटनास्थळी भेट दिली व घडलेल्या गुन्ह्याची सखोल माहिती घेतली. यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते म्हणाल्या मेढा घाटामध्ये सापडलेल्या अन्य दोन डेड बॉडीचे हाडाचे सापळे मृतदेहाचे हाडांचे सापळ्यांचे ओळख पटल्यानंतर हे डेडबॉडी नेमके कोणाचे आहेत हे समोर येणार आहे. सध्यातरी संशयित आरोपीने या संदर्भात केलेले क्राईम विचारात घेता पोलीस तपासात अन्य काही बाबी समोर येतील दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा करून हाडाचा सापळा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घाटात सख्खे भाऊ विशाल जाधव (वय 26) व तुषार जाधव (वय 30) यांचे मृतदेह सापडल्यानंतर परिसर हादरून गेला आहे. चारही मृतदेह सिरीयल किलर या घटनेचा संशयित आरोपी योगेश निकम याने याच घाटामध्ये टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. हत्या केल्यानंतर चारही मृतदेह कुठे टाकले याचे घटनास्थळावर जाऊन परेड घेतली व त्यानंतर दोन्हीही ही सख्ख्या भावाचे मृतदेह काल आणि आज असे एकूण हाडाचे सापळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.