स्थैर्य, मुंबई, दि. ३: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या प्रकरणात आतापर्यंत 5 तपास यंत्रणा त्याची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली याचा छडा लावू शकलेले नाही. या घटनेला आता तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी 16 जून रोजी मुंबई पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबाची एक प्रत समोर आली आहे. त्यात त्यांनी म्हटले होते की, सुशांतवर शंका किंवा त्याच्याकडे कोणतीही तक्रार नाही, कदाचित माझ्या मुलाने नैराश्येतून आत्महत्या केली असावी. मात्र, के.के. सिंह यांच्या या विधानावर त्यांचे वकील विकास सिंह म्हणाले की, मुंबई पोलिसांना त्यांचा जबाब मराठीतून घेऊ नका असे सांगण्यात आले होते, तरीही कुटुंबीयांची त्यावर स्वाक्षरी घेण्यात आली होती.
के.के. सिंह यांनी आपल्या जबाबात सांगितले होते की, 14 जूनपूर्वी सुशांत सिंहची तब्येत ठीक नव्हती. 7 जून रोजी त्यांचे सुशांतसोबत शेवटचे बोलले झाले होते. के. के सिंह यांनी पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात रिया चक्रवर्तीचा उल्लेख केला नव्हता.
सुशांतच्या वडिलांनी मुंबई पोलिसांना काय-काय सांगितले?
- मी 30 वर्षांपासून पाटण्यात राहत आहे. माझी पत्नी उषा यांचे 2002 मध्ये निधन झाले. मला 4 मुली असून मला एक मुलगा आहे.
- माझा मुलगा सुशांत मुंडन सोहळ्यासाठी 13 मे 2019 रोजी पाटण्यात आला होता. तिथे आम्हा दोघींची शेवटची भेट झाली होती.
- सुशांतचा मुंडन सोहळा 15 मे 2019 रोजी झाला होता. त्यावेळी तो तणावग्रस्त नव्हता. तो 16 मे रोजी मुंबईला परत गेला. मी त्याला व्हॉट्सअॅपवर मेसेज करायचो.
- सुशांत माझ्या मेसेजला रिप्लायही देत असे. मी त्याला जास्त कॉल करायचो नाही, कारण तो कामात व्यस्त असायचा. सुशांतच मला फोन करायचा आणि आम्ही चॅटदेखील करायचो. तो मला फोन करून काही गरज आहे का? ते विचारत असे.
- सुशांतने मला 7 जून रोजी शेवटचा फोन केला होता आणि मी त्याला म्हटले होते की, तुला पाटण्याला येऊन एक वर्ष होत आले आहे. तुझी इच्छा असल्यास येथे ये. तो म्हणाला होता की, मी बघतो … माझी तब्येत ठीक नाही. बरे होताच येईल.
सुशांतच्या वडिलांनी सांगितले- मुलाच्या मृत्यूची बातमी टीव्हीवरुन मिळाली होती
- मी
पाटण्यात माझ्या घरात होतो. 14 जून रोजी दुपारी अडीच वाजता टीव्हीवरुन मला
समजले की, सुशांतने आत्महत्या केली आहे. यानंतर, माझी शुद्ध हरपली होती.
मला काहीच कळत नव्हते. मी माझा पुतण्या नीरज सिंह आणि काही नातेवाईकांसह
मुंबईत पोहोचलो. - आम्ही 15 जून रोजी सायंकाळी 5 ते 6 वाजेदरम्यान
विलेपार्ले (पश्चिम) येथे सुशांतवर अंत्य संस्कार केले. त्यानंतर मी
सुशांतच्या वांद्रे येथे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटवर आलो. - मी कुणाला काही बोललो नाही, मी काही विचारले नाही. माझ्या मुलाने आत्महत्या का केली हे मला माहिती नाही.
- त्याने
कधीच माझ्याशी तणावात असल्याविषयी चर्चा केली नव्हती. मला त्याच्यावर शंका
किंवा त्याच्याकडे कोणतीही तक्रार नाही. त्याने नैराश्येतून आत्महत्या
केली असावी असे मला वाटते.
बहीण मितू सिंहने कबूल केले की, सुशांत डिप्रेशनमध्ये होता
यापूर्वी बुधवारी सुशांतची बहीण मितू सिंहचा 16 जून रोजी नोंदवण्यात आलेला जबाब समोर आला होता. त्यात तिने सुशांत नैराश्येत असल्याते कबूल केले होते. मीतूच्या म्हणण्यानुसार, सुशांतने तिला सांगितले होते की तो नैराश्यात आहे आणि 2013 मध्ये मानसोपचार तज्ज्ञाचा सल्लाही घेतला होता.