दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२२ । सातारा । ग्रेड सेपरेटरमधून ५६ टक्के लोक जातात, असे त्यांनी सांगितलेले मला कळाले. माजी नगरसेवक दत्ता बनकर पोवई नाक्यावरच दिवसभर बसलेले असतात. त्यांनी सर्व्हे कंपनी काढून सर्व्हे केला का? वरुन जाणारी वाहनेही त्यांनी खालू गेली असा सर्व्हे केला असेल. माझ्या बुध्दीची किव करण्यापेक्षा काम चुकलेले आहे, फसलेले आहे, हे त्यांनी मान्य करावे. त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीत कळेल, अशा शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खा. उदयनराजे भोसले यांना नाव न घेता टोला लगावला.
साताऱ्यातील पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरवरुन दोन्ही राजांमध्ये शाब्दीक युध्द पेटले आहे. आरोपांवर प्रत्यारोप, पलटवार सुरु आहेत. त्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे आज प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ग्रेड सेपरेटर तत्ज्ञांकडून तयार झाला आहे, हे ठिक आहे. पण, सातारकरांचे काम म्हणणे आहे, हे खासदारांनी लक्षात घेतले पाहिजे. तत्ज्ञ, अधिकारी, ठेकेदार काय म्हणतात, यापेक्षा ज्या लोकांसाठी हा ग्रेडसेपरेटर व्हायला हवा होता, त्यांना त्यांना काय वाटते ते पहा.
ग्रेड सेपरेटरमधून ५६ टक्के लोक जातात, असे त्यांनी सांगितलेले मला कळाले. हा सर्व्हे केला कोणी? माजी नगरसेवक दत्ता बनकर पोवई नाक्यावरच दिवसभर बसलेले असतात. त्यांनी सर्व्हे कंपनी काढून सर्व्हे केला का? वरुन जाणारी वाहनेही त्यांनी खालू गेली असास सर्व्हे केला असेल. माझ्या बुध्दीची किव करण्यापेक्षा काम चुकलेले आहे, फसलेले आहे, हे त्यांनी मान्य करावे. उगच पैसे वाया गेले आहेत. सातारकरांना ग्रेड सेपरेटरचा काही उपयोग होत नाही. संपूर्ण सातारा हे बोलत आहे. पण, ज्यांना हे ऐकायचे नाही, मी म्हणजे फार महान आहे, फार महान करतोय, असा ज्यांना स्वत:चा ढोल वाजवायचा आहे, त्यांना काय बोलणार? त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीत कळेल, असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी दिला.