सुरवडीचे “रॉयल गार्डन” कोव्हीड केअर सेंटरसाठी देणार : सरपंच जितेंद्र साळुंखे – पाटील; गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी केली पाहणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. १८ : सुरवडी गावचे लोकनियुक्त सरपंच जितेंद्र साळुंखे – पाटील यांनी आपल्या स्वमालकीचे असलेले “रॉयल गार्डन” हे मंगल कार्यालय हे कोव्हीड केअर साठी देणार आहे. या बाबत फलटणचे तहसीलदार समीर यादव व फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी रॉयल गार्डन मंगल कार्यालयाची पाहणी केली असून आगामी काळामध्ये सुरवडी, ता. फलटण येथे कोव्हीड केअर सेंटर सुरू करणार असल्याची ग्वाही या वेळी गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी या वेळी दिली.

सुरवडी, ता. फलटण येथील रॉयल गार्डन या मंगल कार्यालयाची पाहणी फलटणचे तहसीलदार समीर यादव, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार, ग्रामविकास अधिकारी डी. जी. ननावरे, एस. आर. राऊत, तलाठी एस. आर. बोबडे, अनिकेत साळुंखे, प्रमोद साळुंखे यांची उपस्थिती होती.

 


Back to top button
Don`t copy text!