स्थैर्य, मुंबई, दि. ०९ (प्रवीण रा. रसाळ) : “मेरा नाम सुरमा भोपाली ऐसें ही नही है…” म्हणत रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेता जगदीप यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दि. ८ जुलै २०२० रोजी मुंबईत निधन झाले, विशिष्ट देहबोली व लकबीने केलेला हजरजबाबीपणा व टायमिंगचा अचूक मेळ यामुळे त्यांचा अभिनय पडद्यावर स्वतःची अशी वेगळी छाप सोडून जायचा, त्यांचे खर नाव “सैयद इश्तियाक अहमद जाफरी” असे असून चित्रपट क्षेत्रात “जगदीप” याच नावाने ते सुप्रसिद्ध होते, बी.आर.चोपडा यांच्या “अफसाना” या चित्रापटातून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरवात झाली व त्यानंतर अनेक लक्षणीय भूमिका साकारत त्यांनी जवळपास ४०० हुन अधिक सिनेमात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला त्यांचा मुलगा जावेद जाफरी व नावेद जाफरी हे ही सध्या सफल अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून कार्यरत आहेत.