
दैनिक स्थैर्य | दि. १७ जून २०२३ | फलटण | फलटण येथील प्रसिद्ध असणाऱ्या संकेत पावभाजी सेंटरचे मालक सुरेश कहार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
फलटण शहरामध्ये गेल्या 35 वर्षांपासून ते पाव भाजीचा गाडा चालवत होते. पूर्वी माळजाई मंदिर परिसरात व गेल्या काही वर्षांपासून फलटणच्या खाऊ गल्ली येथे त्यांचा संकेत पावभाजी सेंटर म्हणून पावभाजीचा गाडा चालवत असत.