स्थैर्य, सुरात, दि.१०: कोरोनाकाळात एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत थंडी असतानाही सुरतच्या हिरे व्यापारात पुन्हा तेजी आली आहे. दिवाळी, नाताळ आणि सणासुदीत हिऱ्याच्या मागणीने व्यवसाय सावरण्यास मदत झाली. सुरत डायमंड असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश नवाडिया यांच्यानुसार, या वेळी चांदी आणि हिऱ्यापासून तयार दागिन्यांची मागणी जास्त आहे. कारागिरांची कमतरता नाही, मात्र कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे ७० ते ७५ टक्के कामगारांकडूनच काम करावे लागत आहे. मागणी एवढी आहे की सर्व उत्पादन विकले जाते.