स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत फलटण तालुक्यातील सोनगाव जगताप वस्ती येथील सुरज विठ्ठल जगताप यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून तहसीलदार पदी निवड झाली आहे. सध्या ते कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत आहेत
आई वडील शेतमजूर , घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असताना सुरज यांनी मिळवलेल्या यशाने कुटुंबीय व सर्व ग्रामस्थ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
सुरज यांचे वडिल हे शेतमजुरी करत आहेत. स्वयंशिस्त व चिकाटी त्यातुनच त्यांनी हे यश संपादन केले आहे . यांचे प्राथमिक शिक्षण हे जि. प. शाळा सोनगाव व माध्यमिक शिक्षण हे श्री जानाई हायस्कूल राजाळे , उच्च माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल फलटण व पदवीचे शिक्षण हे टी. सी. कॉलेज बारामती येथे पुर्ण केले आहे.
सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीतपणे यश मिळवत ते तहसीलदार पदाचे मानकरी ठरले आहेत. अभ्यास करताना अनेक अडचणी आल्या. मात्र, त्यांनी कधी जिद्दी सोडली नाही. आज ते तहसीलदार झाले यांचा आम्हाला व पूर्ण सोनगाव ला अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया त्याचे मामा माजी केंद्रप्रमुख सुर्यकांत निकाळजे यांनी दिली. सर्व ग्रामस्थ व मित्र यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.