
स्थैर्य, फलटण, दि. २५ नोव्हेंबर : प्रभाग ५ मध्ये भाजप उमेदवार रोहित नागटिळे यांनी मतदारांशी घरोघरी भेटताना भावनिक आवाहन केले आहे. ते मतदारांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास कायम ठेवण्याची विनंती करत आहेत.
ते म्हणाले, रणजितदादांचे फलटण शहरात मोठे बदल घडवून आणण्याचे व्हिजन आहे. हे बदल प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला नगरपालिकेत त्यांचा प्रतिनिधी म्हणून पाठवा, अशी विनंती त्यांनी केली.
शहराच्या विकासाच्या या मोठ्या प्रक्रियेत सक्रिय योगदान देण्यासाठी त्यांना मतदारांची साथ हवी आहे.
रोहित नागटिळे यांनी मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वावर आणि विकासाच्या संधीवर भर दिला आहे. त्यांचा हा प्रचार मतदारांना विचार करायला लावणारा ठरत आहे.

