स्थैर्य, मुंबई, दि. २: रेस्टोरंट उद्योगाला पुरवठा साखळीच्या ऑटोमेशनसाठी एसएएएस प्लॅटफॉर्म पुरवणाऱ्या सप्लायनोट या स्टार्टअपने सप्टेंबर २०१९ पासून १२०० रेस्टोरंट्सना भागीदारीत सेवा पुरवण्याचा पल्ला पार केला आहे. पुरवठा साखळीच्या ऑटोमेशनसाठी हा ब्रॅण्ड एक द्विमार्गी (ग्राहक व विक्रेते) एसएएएस प्लॅटफॉर्म पुरवतो. यामध्ये एकात्मिक ई-कॉमर्सच्या माध्यमातून वापरकर्त्यांसाठी वितरण सुलभ केले जाते. या आर्थिक वर्षाच्या अखेरीस २००० हून अधिक रेस्टोरंट्सना सेवा पुरवण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. सप्लायनेट सोल्युशन वापरणाऱ्या रेस्टोरंट आउटलेट्सना त्यांचा कार्यचालन खर्च ८-१० टक्क्यांनी कमी करण्यात मदत झाली आहे. याशिवाय हे सोल्युशन रेस्टोरंट्सचा नफा ७० टक्क्यांनी वाढवून देऊ शकते.
कोविड पश्चात काळात या सोल्युशनसाठीच्या मागणीत वाढ होईल असे ब्रॅण्डला वाटत आहे. अनुकूलन देऊ करणाऱ्या व व्यवसायांचे पैसे वाचवून देणाऱ्या सोल्युशनसाठी मागणी वाढेल असे सप्लायनोटला अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणात मदत आवश्यक असलेल्या रेस्टोरंट उद्योगाच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी ब्रॅण्ड अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपयोजन करणार आहे. हा ब्रॅण्ड देशभरातील १२००+ रेस्टोरंट्सना सोल्युशन देऊ करतो.
सप्लायनोटचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशांग कुमार म्हणाले, “एकदा का निर्बंध दूर झाले आणि रेस्टोरंट्स पूर्ण भरात पुन्हा सुरू झाली की, आमच्या सोल्युशनला मागणी वाढेल. व्यावसायिकांना इन्व्हेंटरीवर देखरेख ठेवण्यात मदत करणारी, त्यांचा कार्यकारी खर्च कमी करणारी आणि अपव्यय टाळणारी सोल्युशन्स वापरण्याची इच्छा आहे. बाजाराचे संभाव्य वर्तन समजून घेता या आर्थिक वर्षाच्या अखेरीस आम्ही २००० हून अधिक रेस्टोरंट्सना सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,”