नितीन देसाईंच्या निधनावर सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑगस्ट २०२३ । मुंबई । प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची अकाली एक्झिट सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी २ ऑगस्टला आत्महत्या करत जीवन संपवलं. नितीन देसाईंनी कर्जत येथील एन.डी. स्टुडिओमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. नितीन देसाई यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलावं यावर कोणालाच विश्वास बसत नाहीए.

नितीन देसाई गेली अनेक वर्ष बॉलिवूडसाठी काम करत होते. अनेक बॉलिवूड कलाकारांच्या ते जवळ होते.  नितीन देसाई यांच्या निधनावर अभिनेता सुनील शेट्टीने शोक व्यक्त करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नितीन देसाई यांच्या निधनाबद्दल बोलताना अभिनेता म्हणाले, “एक अत्यंत प्रतिभावान कला दिग्दर्शक आणि सर्वात नम्र कला दिग्दर्शक आणि एक उत्कृष्ट कला दिग्दर्शक आपण गमावला आहे. असे काय होते घडलं होते ज्यामुळे त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचललं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे? असे म्हणतात की, ‘देवाला नेहमीच चांगली लोक आवडतात’ त्यांना यांची गरज होती का? मला माहीत नाही, पण मी सहवेदना व्यक्त करतो.”

‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘अजिंठा’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी नितीन देसाईंनी कला दिग्दर्शकाचं काम पाहिलं होतं. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही ते लालबागचा राजाच्या मंडपाची उभारणी करणार होते. त्यांच्यावर कोट्यवधींचं कर्ज होते. कर्ज वसुलीच्या तगाद्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी नेहा देसाई यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी खालापूर पोलीस स्थानकांत एडलवाईज ग्रुप आणि इसीएल फायन्सान कंपनीतील चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. नितीन देसाईंच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.


Back to top button
Don`t copy text!