सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य पर्यावरण चळवळीसाठी दीपस्तंभासारखे – उपमुख्यमंत्री अजित पवार


स्थैर्य, मुंबई, दि. २२: ज्येष्ठ पर्यावरणवादी नेते, चिपको आंदोलनाचे प्रणेते, पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांचे कार्य जगभरातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांसाठी दीपस्तंभासारखे आहे. सुंदरलालजींच्या निधनाने पर्यावरण रक्षणाच्या जागतिक चळवळीचे प्रेरणास्त्रोत, मार्गदर्शक हरपले आहेत. सुंदरलालजींनी समाजातील सामान्य माणसाला निसर्गाचे महत्त्व पटवून दिलं. पर्यावरण रक्षणासाठी लढण्यासाठी प्रेरित केले, ताकद दिली.

निसर्ग वाचविण्यासाठी त्यांनी केलेली आंदोलने, पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातील त्यांचे कार्य, नव्या पिढीला कायम प्रेरणा देत राहील. दिवंगत सुंदरलाल बहुगुणाजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करून श्रद्धांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!