
स्थैर्य, फलटण, दि.११: गेल्या 4 – 5 दिवसांपासून पहाटे आणि रात्रीच्या वेळेला तापमानाचा पारा चांगलाच खाली येत असला तरी फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झाल्यामुळे शहरातील ऊस गुर्हाळ चालकांना उन्हाळ्याची चाहूल लागली असून त्यांनी आपली रसवंती गृहे थाटण्याची तयारी सुरु केली आहे.
ऊन्हाळा सुरु झाला की शितपेयांची मागणी वाढत असते. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी रसवंती गृहे सुरू होतात. उन्हामुळे अंगाची लाही कमी करण्यासाठी रसवंती गृहामध्ये ऊसाचा रस पिण्यासाठी मोठी गर्दी पहायला मिळते. फेब्रुवारी महिना सुरु झाल्यामुळे उन्हाळा ऋुतुची सुरुवात झाली असून त्यामुळे शहरात ठिकठिकाणी रसवंती गृहाची उभारणी करण्याची लगबग दिसून येत आहे. रसवंती गृहात थंडावा रहाण्याची काळजी यामध्ये प्रामुख्याने घेतली जात आहे.