ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये समर कॅम्प सुरू


दैनिक स्थैर्य । दि.०५ मे २०२२ । फलटण । गुणवरे ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात ५ मे पासून समर कॅम्पला उत्साहात सुरुवात झाली.

या समर कॅम्प चे उद्घाटन फलटण तालुका क्रीडा अधिकारी व महाराष्ट्र राज्य हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे, प्राचार्य गिरिधर गावडे, प्रशिक्षक तेजस फाळके, चक्रधर जाधव, सुजाता पोमणे, रमेश सस्ते, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

याप्रसंगी महेश खुटाळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर खेळालाही महत्त्व दिले पाहिजे. खेळामुळे शरीर सदृढ होते व शरीर सुदृढ झाल्यामुळे मन खंबीर बनते व मन खंबीर झाल्याने अभ्यासही उत्तम होतो. खेळाबरोबर शिस्तही महत्त्वाची आहे शिस्तीनेच राष्ट्र मोठे होते. तसेच विद्यार्थ्यांना खेळाविषयी अनेक प्रश्न विचारून बोलते केले. नियमित व्यायाम व शिस्तीचे पालन करावे असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या.

यानंतर प्राचार्य गिरिधर गावडे सर यांनी आपल्या मनोगतात चालू वर्षी चा समर कॅम्प संस्थेच्या सचिव सौ साधनाताई गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून पालकांनी ही पहिल्या वर्षी मुलांना सहभागी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानले.

फलटण तालुका क्रीडा अधिकारी व महाराष्ट्र राज्य हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांच्या कार्याचा मुलांना परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रमेश सस्ते यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!