दैनिक स्थैर्य । दि. २२ मे २०२२ । फलटण । ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे या ठिकाणी आज समर कॅम्प चा समारोप करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री ईश्वर तात्या गावडे व सचिव सौ साधनाताई गावडे उपस्थित होत्या. समर कॅम्प मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते सर्टिफिकेट देण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव सौ साधनाताई गावडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी समर कॅम्प मध्ये जे प्रशिक्षण घेतले आहे त्याचा नियमित सराव करावा व दररोज व्यायाम करावा आणि खेळाबरोबर शिक्षणालाही महत्त्व द्यावे. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन आहे असे सांगितले. प्राचार्य गिरिधर गावडे यांनी आपल्या मनोगतात समर कॅम्प मध्ये विविध खेळाचे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले व मुलांनी घेतलेल्या प्रशिक्षणाचा सराव वर्षभर शाळेमध्ये करून घेतला जाईल असे सांगितले. मुलांनी आपल्या मनोगतात जर समर कॅम्प शाळेमध्ये नसता तर आम्ही पूर्ण उन्हाळा टीव्हीसमोर बसून व मोबाईलवर गेम खेळून घालवला असता या समर कॅम्प मध्ये आम्हाला भरपूर काही शिकायला मिळाले . सर्व प्रशिक्षकांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले आणि निश्चितच त्याचा फायदा आम्हाला होईल असे सांगितले. समर कॅम्प यशस्वी करण्यासाठी रमेश सस्ते सर, जाधव सर , पोमणे मॅडम, फाळके सर यांनी सहकार्य केले.