अजिंक्यतारा वरून दरीत उडी टाकून आत्महत्या

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि. 08 : सातारा शहराच्या दक्षिण बाजूला असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्या वरून एका 22 वर्षीय युवकाने आज सकाळी दरीत उडी टाकून आत्महत्या केली आहे .

मी आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने घरी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.  या घटनेनंतर या युवकाचा अजिंक्यतारा किल्ल्या सह परिसरात ठिकठिकाणी शोध घेतला आहे .हा युवक 22 वर्षाचा असून तो पुण्याला रहात असतो. मात्र सध्या संचार बंदी मुळे तो काही दिवसापूर्वी साताऱ्यात आला होता. सोमवारी सकाळी उठून बाहेर फिरायला गेला याच वेळी त्याच्या मोबाईल वरून त्याच्या घरी मेसेज पाठवण्यात आला. तो असा की.. मी आत्महत्या करत असून डोंगरावरुन उडी मारत आहे.. हा मेसेज कुटुंबीयांनी पाहिल्यानंतर सर्व कुटुंबियांना रडू कोसळले ,त्यांनी उलटा फोन लावला .मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर लगेचच मेसेज च्या आधारावर युवकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र अद्यापही काहीच ठावठिकाणा लागलेला नाही.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!