व्यावसायिकाची आत्महत्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील जिजामाता कॉलनीत राहणाऱ्या भरत लक्ष्मण वाईकर यांनी महादरे तळ्याशेजारील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दरम्यान, वाईकर हे दूग्ध व्यवसायिक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, भरत र्वाइकर हे दूध व्यवसाय करत होते. मात्र, ते कर्जबाजारी असल्याने नैराश्यात होते. मंगळवारी दुपारी ते घराबाहेर पडले आणि शहरापासून जवळच असलेल्या महादरे तळ्याशेजारील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात पाठविला. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास हवालदार सुहास पवार करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!