स्थैर्य, दि.२६: भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशामधे शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. तो शेतीमधे वेगवेगळे प्रयोग करून काबाडकष्ट करून शेतीचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न करतो, अशाच एका शेतकऱ्याने एकाच शेतात तीन तीन हंगाम घेऊन यशस्वी शेती करणाऱ्या एका यशस्वी शेतकऱ्याची यशोगाथा.
गजानन शिंदे हे फलटण तालुक्यामधील गुणवरे गावातील रहिवासी आहेत. परंतु शेतीसाठी जास्तीत जास्त वेळ देता यावा म्हणून ते गावातून शेतातच राहायला गेले. त्यांना लहानपनापासूनच शेतीची आवड होती. त्यामुळे ते शहरातील नोकरी सोडून गावाकडे राहायला आले.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी वारंवार संघर्ष करावा लागत आहे. सरकारकडून शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव देण्यासाठी आश्वसने दिली जातात. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिति सुधारायची असेल तर शेतकऱ्यांनी नवे तंत्र अवलंबिले पाहिजे. यासाठी त्यांनी पारंपारिक ऊसाची शेती करण्याऐवजी डाळिंबाची शेती करण्याचा निश्चय केला. व्यवस्थापनासाठी येणारा खर्च भागवण्यासाठी त्यांनी आंतरपीक म्हणून सोयाबिनची लागवड केली. या अगोदर ते शेतात लागवडीसाठी पारंपारिक पिकांचा अवलंब करित होते. त्यातून त्यांना मिळणारे उत्पन्न अत्यल्पच.
सुरूवातीस त्यांच्या जमिनीत खूप सारे काटेरी वृक्ष होते. ते काढून घेऊन मशागत करुन सुरूवातीस बाजरी, मका यांसारखे पीक घेतले. व त्याच जमिनीत डाळिंबाचे साधा भगवा हे वाण व सोयाबीनचे महाबीज-३३५ ह्या वाणांची लागवड केली. या सोयाबिनला २५०-३५०शेंगा लागल्या होत्या. व त्यापासून २८-३०क्विंटल उत्पादन झाले आहे. यांतून त्यांना खर्च वजा करता एक लाख रुपये नफा मिळाला असून त्यांनी त्यामध्ये पाच महिन्याचा देशी गरवा कायदयाची लागवड करण्याचे ठरविले आहे. यामधे त्यांना त्यांची पत्नी सौ. उषा गजानन शिंदे व दोन मुले मदत करत असतात.
• पारंपारिक पिकांमधून होणारा अनियमित अर्थपुरवठा-
गजानन शिंदे सांगतात कि पारंपारिक पिकांमधे १२-१८ महिने जमिन गुंतून राहते. त्यामुळे नवीन पीक घेता येत नाही व त्यामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात. शेतीसाठी लागणारा आर्थिक पुरवठा खंडित होतो. त्यामुळे त्यांनी डाळिंबाची शेती करण्याचा निश्चय केला.
• शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन-
शेतीपुरक व्यवसाय म्हणून ते पशुपालन करतात. त्यासाठी त्यांनी एक गाय घेतली. व त्यापासून १४-१५ गायींचे उत्पादन केले.त्यातून होणाऱ्या दुग्ध उत्पादनापासून आर्थिक मदत होते व शेणाचा वापर शेतीसाठी खत म्हणून होत असतो. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय शेती ते करत आहेत.
• तण निर्मुलन-
शेतामधून निघणाऱ्या तणाचा वापर गायींना चारा म्हणून ते करत नाहीत. त्याचा फायदा शेतामधे तण निर्मुलन होत असते. शेण खताचा वापर करुन सुध्दा जमिनीत कोणत्याही प्रकारचे तण आढळत नाही.त्यामुळे तण निर्मुलन होण्यास मदत होते. त्यामुळे खुरपणी चा खर्च कमी होतो. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या तणनाशकांचा वापर या फळबागेत करायची आवश्यकता भासत नाही.
गजानन शिंदे आजच्या नव्या पिढीला व इतर शेतकरी बंधूना संदेश देताना असे सांगतात; शेती स्वतः कष्ट करुन केली ,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केल्यास शेतीमध्ये भरपूर फायदा मिळू शकतो. अशा पद्धतीने शेती केली तर ती उपजीविकेसाठी फायदेशीर आहे.
– शिंदे अनुराधा सुखदेव ,
अभ्यासक, कृषी महाविद्यालय,पुणे.
ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम
केंद्र– कृषि अभियांत्रिकी शास्त्र
केंद्रप्रमुख– डॉ.आर.डी.बनसोड सर
कार्यक्रम अधिकारी – डॉ.एस्.एस्.शिंदे मँडम