मुधोजी महाविद्यालयाचे महिला कुस्ती स्पर्धेमध्ये यश


दैनिक स्थैर्य | दि. २५ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतरविभागीय महिला कुस्ती स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालय, फलटणने फ्री स्टाईल महिला कुस्ती स्पर्धेत कु. ऋतुजा पवार हिने ५३ किलो वजन गटात कास्यपदक पटकावले, तर कु. प्राची सावंत हिने ५९ किलो वजन गटात कास्यपदक जिंकले. या महिला पैलवानांनी उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.

या विजयाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर, मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!