किंग फायटर कराटे क्लबचे किक-बॉक्सिंग स्पर्धेत यश


दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑगस्ट २०२२ । बारामती । किकबॉक्सिंग स्पोर्टस असोसिएशन पुणे शहर व पुणे जिल्हा अंतर्गत पुणे जिल्हा (पुणे शहर व पुणे ग्रामीण) खुली कॅडेट, जुनिअर व सिनियर किक बॉक्सिंग स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा कॅडेट, जुनियर व सिनियर या गटांमध्ये पार पडली. या स्पर्धेमध्ये किंग फायटर कराटे क्लब च्या मुला मुलींनी नाव नोंदणी करून सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे आयोजन सोलारीस क्लब,कोथरूड, पुणे येथे पार पडली या स्पर्धेत सुमारे 650 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यामध्ये आपल्या क्लब मधील खेळाडूंनी विविध वयोगटात व वजना नुसार फाईट खेळून यश संपादन केले.यामध्ये गौरव गाढवे,आशुतोष लोंढे,राजनंदिनी लोंढे यांनी प्रथम क्रमांक मिळविला व द्वितीय क्रमांक नेहा गावडे,तनिष्का गायकवाड,श्रावणी शिंदे तसेच तृतीय क्रमांक शिवराज घाडगे,अभिषेक येतकाळे,सोहम डांगे,ओम बागाव,साक्षी गावडे,जान्हवी जाधव,श्रावणी कामटे यांनी मिळविला.

हे सर्व खेळाडू ग्रामीण भागातील आहेत. केवळ चांगले मार्गदर्शक व या विद्यार्थ्यांचे कष्ट यामुळे यांनी चमकदार कामगिरी करून आपल्या गावाचे नाव उज्वल केले आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र पोलीस मास्टर दादासो माने यांच्याकडून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण किट दिले जाईल. अशी माहिती श्री.आप्पासाहेब देवकाते सर यांनी दिली. व स्पर्धेत विजयी झालेल्या सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!