स्थैर्य, लोणंद, दि.८: आठ दिवसांपूर्वी सालपे घाटातून ट्रकसह सुमारे 33 लाखांच्या मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद लोणंद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. लोणंद पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाच्या जोरावर चोरी झालेल्या ट्रक सह मुद्देमालाचा शोध लावण्यात यश मिळवले आहे.
दिनांक १ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा च्या सुमारास मौजे.सालपे ता.फलटण गावचे हददीत सालपे घाट सुरु होणेचे आगोदर निरा ते सातारा जाणारे रोडवर एक नंबर नसलेल्या दुकाचीवरुन आलेल्या तीन इसमांनी फिर्यादी सचिन माणीक कोळी यांचे मालकीचा ट्रक क्रं.एम.एच .० ९ सी.यु.९८३३ याला दुचाकी आडवी लावली व पाठीमागुन आलेल्या अजुन दोन इसम असे एकुण पाच अनोळखी इसमांनी सदर ट्रकचालकास मारहान करुन सदर ट्रकचालकाचे हात – पाय बांधुन ट्रकसह चोरुन घेवुन गेले बाबत लोणंद पोलीस ठाणेस दरोडयाचा गुन्हा दाखल झाला होता . सदर दाखल गुन्हयाचे अनुशंगाने मा.अपर पोलीस अधिक्षक धिरज पाटील तसेच उप विभागीय पोलीस अधिकारी , फलटण विभाग फलटण तानाजी बरडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सपोनि संतोष चौधरी यांनी तपास हाती घेवुन तपासकामी दोन टिम तयार केल्या . सहा तालुक्यात सहा दिवस चिकाटीने सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेच्या आधारे सुमारे १२५ किमी चा गाडीचा मार्ग शोधून गाडीचा मागोवा घेवुन गाडी व त्यातील बहुतांश मुद्येमाल ताब्यात घेतला आहे .
तसेच आरोपींचा शोधही सुरु आहे .
सदर कारवाई मध्ये सपोनि संतोष चौधरी , पोनि.माने , पोहवा.सपकाळ , संतोष नाळे , फैय्याज शेख , श्रीनाथ कदम , अमोल अडसुळ , केतन लाळगे , शशीकांत गार्डी , अविनाश शिंदे , सागर धेंडे , अभिजीत घनवट , होमगार्ड रब्बानी शेख यांनी महत्त्वपुर्ण कामगिरी केली .