अमेरिकेत ‘हायपरलूप’ प्रकल्पाच्या मानवी चाचणीला यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

पुण्याच्या तरुणाची अद्वितीय कामगिरी

स्थैर्य, पुणे, दि.१०: ‘हायपरलूप’ प्रकल्पाला चालना मिळण्याच्या दिशेने अमेरिकेने एक महत्वपूर्ण
पाऊल टाकले आहे. ‘लास वेगास’ येथील केंद्रावर ‘व्हर्जिन हायपरलूप’च्या
वतीने ‘हाय स्पीड पॉड सिस्टीम’ ची पहिली यशस्वी मानवी चाचणी रविवारी
घेण्यात आली. आणि सोमवारी घेण्यात आलेल्या दुस-या मानवी चाचणीत भारतासह
पुण्यासाठी अभिमानाची व गौरवास्पद अशी गोष्ट घडली. ती म्हणजे मूळ पुणेकर
असलेला तनय मांजरेकर हा इंजिनियर तरुण दुस-या मानवी चाचणीत सहभागी झाला
होता. या दोन मानवी चाचण्यांना मिळालेल्या यशामुळे पुणे- मुंबई दरम्यानच्या
प्रस्तावित ‘हायपरलूप’ प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा सकारात्मक आशा पल्लवित
झाल्या आहेत.

अमेरिकेतील नामवंत व्यावसायिक रिचर्ड
ब्रँनसन यांच्या ‘व्हर्जिन हायपरलूप’ च्या वतीने हायपरलूप प्रकल्पाच्या
अनुषंगाने जवळपास आजपर्यंत चारशे मानव विरहित चाचण्या पूर्ण केल्या आहेत.
त्यानंतर रविवारची चाचणी ‘व्हर्जिन हायपरलूप‘ सर्वांचेच लक्ष लागून होते.
कारण पहिली ती मानवी चाचणी होती. आणि सोमवारी घेण्यात आलेल्या दुस-या मानवी
चाचणीत पुण्याचा तनय मांजरेकर हा सहभागी झाला होता. पहिल्या मानवी चाचणीचे
पहिले प्रवासी होण्याचा मान हायपरलुपचे टेक्नॉलॉजी अधिकारी जोश गेगल आणि
संचालक सारा लुशियन यांना मिळाला. दुस-या मानवी चाचणीत पुण्याच्या तनय
मांजरेकरसह हायपरलुपचे सर्व अधिका-यांना प्रवास करण्याची संधी देण्यात आली
होती. सलग दोन मानवी चाचण्यांना मिळालेले यश वाहतूक क्षेत्रात क्रांतिकारी
बदल घडवण्याच्या दृष्टीने आशेचा किरण जागविणारे आहे.

या महत्वाच्या प्रकल्पात सहभागी झालेला
तनय मांजरेकर याने हा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून इलेक्ट्रॉनिक्स
अँड टेलिकम्युनिकेशन शाखेची पदवी प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे तनयने
हायपरलूप तंत्रज्ञान विकसनात विद्युत अभियांत्रिकी म्हणून काम पाहिले
आहे.तसेच त्याने युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियातून विद्युत
अभियांत्रिकी शाखेत पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. २०१६ पासून तन्मय
व्हर्जिन हायपरलूपमध्ये काम करतो आहे.

या अद्वितीय अनुभवाबद्दल तनय म्हणाला,
हायपरलूपसाठी काम करायला मिळणे आणि त्याचसोबत प्रवासाची संधी माझ्या
जीवनातली फार नाविन्यपूर्ण आणि भाग्याची गोष्ट आहे. माझे स्वप्नच सत्यात
उतरल्याची भावना यावेळी मनात आहे. त्याचप्रमाणे आपला भारत देश सुद्धा नवीन
क्रांतिकारी तंत्रज्ञानाच्या दिशेने आपला प्रवास सुरु ठेवेल. आणि नवनवीन
अभूतपूर्ण नवनवीन संधीची भविष्यातील गरज ओळखून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी
प्रयत्नशील राहील. पुणे-मुंबई हायपरलूप प्रस्तावित प्रकल्पाकडे सकारात्मक
पद्धतीने काम करत सुरु ठेवेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!