फलटण तालुक्यात “लाडकी बहीण” योजनेचे अनुदान वितरणास प्रारंभ : दत्तात्रय गुंजवटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 15 ऑगस्ट 2024 | फलटण | महाराष्ट्र शासनाची महत्त्वपूर्ण असणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे गत दोन महिन्यांचे रुपये 3 हजार अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण होण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फलटण तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंजवटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना गुंजवटे म्हणाले की; फलटण तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 58,450 अर्ज लाभार्थ्यांकडून प्राप्त झाले होते. त्यापैकी 57,468 अर्ज मंजूर करण्यात आले असून 794 अर्ज प्रलंबित आहेत. तर पुरेशा कागदपत्रांच्या अभावी 64 अर्ज नामंजूर करण्यात आलेले आहेत.

मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वी राबवल्याचे गुंजवटे यांनी यावेळी स्पष्ट केले.

फलटण तालुक्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी यशस्वीरित्या राबवण्यासाठी फलटणचे कार्यक्षम प्रांताधिकारी तथा मुख्यमंत्री लाडके बहिण समितीचे सदस्य सचिव सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांच्यासह महसूल, नगरपरिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे; असेही गुंजवटे यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!