फरांदवाडी येथील कृषिक्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनी चेअरमनपदी सुभाष भांबुरे, व्हाईस चेअरमनपदी प्रमोद शिंदे व सचिवपदी जगदीश बोराटे यांची निवड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, फलटण दि.२५ : कृषिक्रांती अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि., फरांदवाडी ता. फलटणचे चेअरमनपदी सुभाषराव भांबुरे, व्हाईस चेअरमनपदी प्रमोद शिंदे व सचिवपदी जगदीश बोराटे यांची एकमताने निवड करण्यात आली असून त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे. 

फरांदवाडी ता. फलटण येथील कृषिक्रांती अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी चेअरमनपदी निवड झालेले सुभाषराव प्रभाकर भांबुरे प्रगतशील शेतकरी, व्यवसायिक आणि वृत्तपत्र क्षेत्रात तालुका प्रतिनिधी, साप्ताहिक श्रीहरी सुभाषितचे संपादक म्हणून सर्व परिचीत आहेत. व्हाईस चेअरमनपदी निवड झालेले प्रमोद बाबुराव शिंदे प्रगतशील शेतकरी, व्यवसायिक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून सर्वपरिचीत आहेत तर सचिवपदी निवड झालेले जगदीश श्रीनिवास बोराटे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचीत आहेत. 

अरविंद रावसाहेब भोईटे यांचे निधन

जून 2015 मध्ये शासकीय योजनेतून शेतकरी हितासाठी फरांदवाडी येथील शेतकर्‍यांनी एकत्र येवून फरांदवाडी कृषिक्रांती अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. शेतकर्‍यांना कंपनीचे माध्यमातून त्यांचे उत्पादित धान्य स्वच्छ व प्रतवारी करुन देण्यासाठी आवश्यक मशिनरी (ग्रेडींग युनिट), बसविण्यात आली आहे. शेतकर्‍यांना खते, बी-बियाणे, किटकनाशक औषधे, दर्जेदार व रास्तदरात उपलब्ध करुन देण्याबरोबर, भाजीपाला खरेदी विक्री, धान्याचे पॅकींग करुन खरेदी विक्री केली जात असून शेतकर्‍यांना अधिक आर्थिक फायदा कसा होईल यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ व अन्य मार्गदर्शन करण्याची व्यवस्था या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 

कृषिक्रांती अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी लि., फरांदवाडी चेअरमनपदी सुभाषराव भांबुरे, व्हाईस चेअरमनपदी प्रमोद शिंदे व सचिवपदी जगदीश बोराटे यांची निवड 5 वर्षासाठी करण्यात आली असून मेघराज बोराटे कपिल राऊत अश्‍विनी राऊत व सुजाता राऊत हे संचालक म्हणून कार्यरत आहेत. चेअरमन/ व्हा. चेअरमन निवडीच्यावेळी शेतकरी, सभासद उपस्थित होते.

अरुण लाड व प्रा. जयंत आसगावकर या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन सातारा जिल्ह्याचा वैचारिक वारसा जपावा : श्रीमंत रामराजे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!