दैनिक स्थैर्य । दि.१५ फेब्रुवारी २०२१ । दहिवडी । एका बाजूला जग कोरोना महामारीच्या सामना करत असताना आपला शिक्षण विभागही त्यापासून अलिप्त नाही. जवळजवळ दोन वर्षे शाळा बंद आहेत.शाळा भरण्यावर व पुन्हा टाळेबंदी लागल्यावर बंद होण्यामुळे शिक्षणाची धरसोड होत आहे.अशा कठीण परिस्थितीमध्ये पालक, शिक्षक व स्वतः विद्यार्थी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत.अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी शारीरिक, मानसिक विकासावर भर देत भविष्याचा वेध घेत शैक्षणिक तयारी करायला पाहिजे.येणार्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये उभं केलं पाहिजे.तर आणि तरच आपला निभाव लागेल.असे प्रतिपादन प्राथमिक शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.ते दहिवडी कॉलेज दहिवडी येथे १२ वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व शुभचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करत होते.
पुढे ते म्हणाले,१२ वी नंतर असणाऱ्या नोकरी, व्यवसायाच्या संधी व त्यासाठी करावयाचे प्रयत्न तसेच करीअर याबाबत विद्यार्थ्यांनी सतर्क राहून संवाद साधला पाहिजे.नवनवीन संधी शोधल्या पाहिजेत.
यावेळी उपप्राचार्य सौ. नंदिनी साळुंखे, केंद्रप्रमुख नारायण आवळे,वाणिज्य विभागप्रमुख मस्के व्ही.एस. पत्रकार रुपेश कदम,उमेश बुधावले, प्रवीण राजे,नवनाथ भिसे,किरण खाडे, एकनाथ वाघमोडे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.