दैनिक स्थैर्य | दि. २२ जुलै २०२३ | फलटण |
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेच्या वतीने सन २०२२-२३ मध्ये घेण्यात आलेल्या इ. ५ वी पूर्व उच्च प्राथमिक व इयत्ता आठवीच्या पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. या परीक्षेमध्ये फलटण तालुक्यातील कोळकी येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे इ. ५ वी मधील कु. राजवीर मच्छिंद्र पवार, कु. आजलान फारूक मुलाणी व इ.८ वी मधील कु. श्रावणी प्रफुल्ल कदम, कु. केशव तुषार महानवर, कु. मानसी मयूर नलवडे या पाच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून तालुका व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. तसेच हे विद्यार्थी शिष्यवृतीसही पात्र ठरले आहेत.
या यशाबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रदीप माने, सचिव श्री. विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने, समन्वयिका सौ. सुवर्णा निकम व श्रीमती योगिता सस्ते यांच्यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केलेल्या शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले व सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.