दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२२ । सातारा । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मुंबई मार्फत राबविल्या जाणाऱ्या सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातील इ. 10, 12 वी, पदवी, पदव्युत्तर इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विशेष प्राविण्य (60 टक्के पेक्षा जास्त) गुण मिळवून उत्तीर्ण गुणानुक्रमे पहिल्या 5 विद्यार्थी-विद्यार्थींना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांनी आपले अर्ज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, 22 अ, जुनी एमाअयडीसी रोड, बॉम्बेस्टॉरंट, उड्डाणपूल जवळ, सातारा येथे 25 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.एच. चव्हाण यांनी केले आहे.