दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । सातारा । येथील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा व शिका योजनेतील विद्यार्थी व प्राध्यापक आज सातारा येथील ग्रंथ महोत्सवास भेट दिली. ग्रंथ महोत्सवात विविध कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांनी साहित्य प्रबोधन आणि साहित्याचा आनंद घेतला. ग्रंथोत्सवात विविध स्टॉलला भेटी देऊन त्यांनी कथा,कादंबरी इत्यादी विविध साहित्य प्रकारातील साहित्य. माहितीपूर्ण ग्रंथ यांची माहिती करून घेतली. नियमित सकाळ संध्याकाळ ४ तास कॉलेजच्या शेतात काम करून आपले कॉलेज करणारे
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले हे विद्यार्थी यांना शारीरिक श्रमाबरोबरच व्यवहारिक शिक्षण, कौशल्यपूर्ण शिक्षण, तसेच साहित्य संस्कृती व कला इत्यादीचे वातावरण कमवा व शिका योजनेमार्फत उपलब्ध करून दिले जाते.जागो हिंदुस्तानी हा देशभक्तीपर कार्यक्रम विद्यार्थ्यांनी पाहिला. व्याख्यानाचा आस्वाद घेतला. आयोजक शिरीष चिटणीस इत्यादी मान्यवरांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी पुस्तके खरेदी केली. कमवा व शिका योजनेचे प्रमुख व उपप्राचार्य डॉ.रामराजे देशमुख ,प्रा.राहुल वराडे पाटील, प्रा.बाळासाहेब वाघ इत्यादींनी या भेटीचे आयोजन केले. प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर यांचे मार्गदर्शनाने सदर भेटीचे आयोजन करण्यात आले.