कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी शून्य ऊर्जा शीतगृहाचे दिले प्रात्यक्षिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी पिंपरद येथे शून्य ऊर्जा शीतगृहाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

हे शीतगृह तयार करण्यासाठी १६५ सेमी लांब सेमी रुंदी आणि ६७ सेमी उंची ही मापे घेऊन शीतगृह तयार करण्यात आले. या शीतकक्षामुळे फळे व पालेभाज्या साठवण कालावधी वाढण्यास मदत होते. शीतकक्षाचा वापर फळांचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी करता येतो तसेच फळांची साठवण कमी तापमान आणि योग्य आद्रतेमध्ये केल्यास त्यांचा साठवण कालावधी वाढविणे शक्य आहे. त्यामुळे शीतकक्षातील साठवणुकीमुळे फळे जास्त काळ टिकतात, हे महत्त्व कृषीकन्यांनी शेतकर्‍यांना पटवून दिले. यावेळी दहा शेतकरी उपस्थित होते.

कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण सर व कार्यक्रम समन्वयक नीलिमा धालपे मॅडम तसेच कार्यक्रम अधिकारी स्वप्निल लाळगे सर, नितिशा पंडित मॅडम आणि रश्मी नाईकवाडी मॅडम यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली कृषीकन्या कु. प्रतीक्षा जगताप, आर्या जाधव, अक्षदा जाधव, प्रणिता गोडसे, निशिगंधा खुडे, समृद्धी जगताप, आरती जाधव यांनी हे प्रात्यक्षिक करून दाखविले.


Back to top button
Don`t copy text!